अभिनेता सलमान खानच्या घरातून सराईत आरोपीला अटक

अनोळखी व्यक्तींच्या घरात घुसून चाकूच्या धाकावर चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा 4 च्या पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या घरातून अटक केली आहे . शक्ती  सिद्धेश्वर राणा (62) असं त्याचं नाव आहे. 29 वर्षापूर्वी राणाने एका व्यक्तीच्या घरी दरोडा टाकला होता. माञ ओळख लपवून तो सलमानच्या घरी मागच्या 15 वर्षापासून काम करत होता. माञ या प्रकरणाशी सलमानचा काही एक संबध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

  1990 साली वरळी परिसरात मुलं आणि पत्नीसह राणा रहात होता. हाताला काम नाही अाणि घरची परिस्थिती हे बेताची असल्याने त्याने त्या वेळी दोन साथीदारांच्या मदतीने एका घरात घुसून घर मालकाला मारहाण करत लूट केली होती.  या प्रकरणात गुन्हेशाखेच्या पोलिसांनी राणाला त्यावेळी अटक केली. कालांतराने न्यायालाने त्याला जामिनावर सोडले. माञ त्यानंतर राणा हा न्यायालयीन तारखांना गैरहजर राहू लागला. पोलिसांपासून चार हात लांब रहावे म्हणून त्याने वरळीतून फरार झाला. तारखांना गैरहजर राहणाऱ्या राणा विरोधात न्यायालयाने अटक वाँरट जारी केले.
राणाचा शोध गुन्हे शाखा 4 चे पोलिस घेत असताना. राणा हा अभिनेता सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यावर केअरटेकर म्हणून रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी बुधवारी शक्ती राणा याला सलमान खानच्या बंगल्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. 
पुढील बातमी
इतर बातम्या