आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी; १७ दिवसांनंतर मिळणार बेल?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर न्यायालय बुधवारी सुनावणी करणार आहे. आर्यन खान याला क्रुझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. गेले १७ दिवस याप्रकरणी आर्यन तुरुंगवासात आहे. एनसीबीनं ३ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली होती. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला आहे.

आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयानं गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. एनसीबीनं १४ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जाला विशेष एनडीपीए न्यायालयात विरोध केला आणि दावा केला की तो ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीचे म्हणणे मांडले. आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून मादक पदार्थांचा नियमित ग्राहक होता हे दाखवणारे पुरावे आहेत, असे अनिल सिंह यांनी म्हटलं होत. यासह, त्यांनी आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप पुन्हा केला.

आर्यनच्या अटकेपासून, एनसीबी म्हणत आहे की त्याच्याकडून वैयक्तिकरित्या काहीही मिळाले नाही. मात्र, ड्रग्ज तस्करांशी त्याचे संबंध व्हॉट्सअॅप चॅटद्वारे उघड झाले आहेत. एएसजीने पुढे सांगितले की, क्रूझमधील अरबाज मर्चंटकडून जप्त केलेले अंमली पदार्थ आर्यन आणि मर्चंटसाठी होते. आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांच्या सदस्यांशी संबंध असल्याचा दावा एनसीबी करत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या