ग्रॅन्ट रोडमधील कुंटणखाण्यातून ११ बांग्लादेशी तरुणींची सुटका

बांग्लादेश म्हणजे भारताचा अगदी शेजारी देश. सध्या याच बांग्लादेशमधून भारतात वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींची सर्रास तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्रॅन्ट रोड येथील कुंटणखान्यातून १६ मुलींची सुटका केली असून यातील ११ मुली बांग्लादेशी आहेत. पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

कुंटणखान्यात विक्री

बांग्लादेशमधील गरीब कुटुंबातील एका तरुणीला मुंबईत चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमीष दाखवत  भारतात आणलं होतं. काही दिवस त्या मुलीला दलालांनी नवी मुंबईत ठेवलं होतं. मात्र, कालांतराने त्या मुलीला दलालांनी ग्रॅन्ट रोड येथील कुंटणखान्यात ढकललं. त्या मुलीची कुंटणखान्यात विक्री करून दलाल निघून गेले. त्यानंतर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेने तिला वेश्या व्यवसाय करण्यास जबरदस्ती केली. तिने त्यास विरोध दर्शवला असता तिला मारहाण करून डांबून ठेवण्यात आलं.

अनोळखी व्यक्तीकडून माहिती

या मुलीची माहिती अनोळखी व्यक्तींनी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला दिली. पोलिसांनी या कुंटणखान्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी त्या कुंटणखान्यातून १६ मुलींची सुटका केली. त्यातील ११ मुली या बांग्लादेशी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.


हेही वाचा  -

ओशिवरात नैराश्येतून माॅडेल तरूणीची आत्महत्या

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली

उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या