भाजपा आमदार अमित साटम यांनी महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. शिवीगाळ केल्याचा हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र आपण ही शिवीगाळ केली नसून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र साटम यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.
काय म्हणाले साटम, ऐका...
खोटी शिवीगाळ
अमित साटम हे भाजपाचे अंधेरी पश्चिम भागातील आमदार आहेत. त्यांच्यावर के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. फोन संभाषणातील सुरूवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेल्या संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांचं संगनमत
विधानसभेत एसआरए इमारतींचा ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणल्याने महापालिका आणि एसआरएचे ३६ अधिकारी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोपही अमित साटम यांनी केला आहे. तसंच भविष्यात या लोकांकडून धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून १० महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुनं असावं. असं कोणतंही संभाषण झाल्याचं आपल्या आठवणीत नाही, असा दावाही साटम यांनी केला.
दबाव आणण्याचा प्रयत्न
अभियंते पवार यांच्याशी आपले चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण विधानसभेत ५० हजार कोटींचा 'बिल्डिंग स्कॅम' बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरू असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करुन दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असं साटम म्हणाले.

हेही वाचा-
आ. अमित साटम यांची जुहूत फेरीवाल्यांना मारहाण, पोलिसांनाही शिवीगाळ
धक्कादायक! पत्रकाराला धावत्या लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न