मुंबईतील एका ३० वर्षीय विवाहितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिच्याजवळ शरिरसुखाची मागणी करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कयूर शहा (३०) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचाः- अभिनेता टायगर श्रॉफ सारखं स्टंट करणं पडलं महागात
काही दिवसानंतर विवाहितेने कयूरकडे तिने दिलेल्या पैशांची मागणी केली असता. कयूर उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्याने विवाहितेला तिचे काढलेले फोटो सर्वत्र वायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. विवाहितेच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवू लागला. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने ओशिवरा पोलिसात ५०९,५०७ भा.द.वी. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून कयूरला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपासकरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली.