रुग्णाचे एटीएमकार्ड घेऊन केअरटेकर फरार

मुंबईतल्या बाँम्बे रुग्णालयात एका रुग्णाला केअर टेकरची मदत घेणे भलतेच महागात पडलं आहे. औषधोपचारासाठी पैसे कमी पडल्यानं रुग्णानं केअर टेकरजवळ त्याचं एटीएम दिलं होतं. मात्र, त्यावेळी केअर टेकरनं एटीएममधून पैसे काढून पळ काढला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी त्या केअर टेकरला अटक केली आहे.

बॉम्बे रुग्णालयात उपचार

नील दांडेकरक असं या रुग्णाचं नाव आहे. नील हे बोरिवली परिसरात राहणारे असून त्यांना मागील काही दिवसांपासून यकृताचा त्रास होत होता. त्यामुळं ते १८ एप्रिलपासून बाॅम्बे रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान नीलला त्यांच्या देखभालीसाठी एका केअर टेकरची गरज होती. त्यानुसार, त्यांच्या मित्रानं त्यांना प्रशांत काथे (३५) याचा नंबर दिला. प्रशांत काथे (३५) हा नीलच्या मदतीसाठी रुग्णालयात थांबायचा. काही दिवसांपूर्वी नीलवर उपचार सुरू होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला काही औषधं आणण्यास सांगितली होती. मात्र, औषधांची किंमत जास्त असल्यामुळं तितके पैसे नीलकडं नव्हते. त्यामुळं नीलनं प्रशांतजवळ त्याचे एटीएम कार्ड आणि पासवर्ड देत पैसे काढून आणण्यास सांगितले होते.

फोन बंद

नीलनं सांगितल्यानुसार प्रशांतनं पहिल्यांदा एक हजार काढले. त्यानंतर नीलनं पून्हा त्याला दीड हजार रुपये काढण्यास सांगितलं. त्यानुसार प्रशांतनं पून्हा दीड हजार असे एकून अडिच हजार काढले. प्रशांतला जाऊन खूप वेळ झाला होता. मात्र तो परत आला नसल्यामुळं नील त्याला फोन लावत होता. सुरूवातीला जवळील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळं तो लांब पैसे काढण्यासाठी आला असल्याचं त्यानं नीलला सांगितलं. परंतु, काही वेळावं त्याचा फोन बंद येऊ लागलाा.

पोलिस ठाण्यात तक्रार

त्यावेळी नीलनं त्याचं बँकेत फोनकरून कार्ड ब्लॉक केलं. मात्र, कित्येक तास उलटले तरी प्रशांत न आल्यामुळं तो कार्ड आणि पैसे घेऊन पळून गेल्याची नीलला खात्री पटली. त्यावेळी त्यानं आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रशांतचा माग काढण्यास सुरूवात केली. प्रशांत हा कल्याणच्या विठ्ठलवाडी परिसरात रहात असून त्याचे मोबाइल लोकेशनही त्याच परिसरात दाखवत असल्यानं पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत वाखारे यांनी दिली.


हेही वाचा -

पावसाळ्यात विविध दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

'परे'वर आज रात्री तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लक


पुढील बातमी
इतर बातम्या