माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयने दाखल केला एफआयआर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसुलीच्या आरोपांवरून सीबीआयने  एफआयआर दाखल केला आहे. तसंच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह  दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सिंह यांनी आरोपांची सखोल चौकशी व्हावी याकरीता सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला १५ दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. 

यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची ११ तास चौकशी केली होती. तसंच त्यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील १० तास चौकशी केली होती. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले. 

राऊत म्हणाले की,  अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू.


हेही वाचा -

वाहनांवर स्टिकर लावण्याचा आदेश अवघ्या ७ दिवसांत रद्द

बनावट ओळखपत्रावर अनेकांचा लोकल प्रवास; रेल्वे पोलिसांकडून धरपकड


पुढील बातमी
इतर बातम्या