सुशांत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने फास आवळला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दोन महिने झाले. मात्र तरीही त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून दोन राज्यांचे पोलिस एकमेकांसमोर उभे राहिले होते. आरोप प्रत्याकोपाच्या फैरीतून सुप्रीम कोर्टाने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला. अवघ्या तीन दिवसात सीबीआयने सर्व संशयित आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचाः- गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री

 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयने आता फास आवळण्यास सुरूवात केली आहे. रविवारी सीबीआयचे अधिकारी त्यांच्या फाँरेन्सिक टिमसह सुशांतच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी ३ तास घरातील काना कोपऱ्यात तपासणी केली. इतकचं काय तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊनही काही संशयास्पद गोष्ठी सापडतायत का ते पाहिले. त्यावेळी सोबत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठानी आणि कूक नीरज हेही सोबत होते. सुशांतने आत्महत्या केली त्याच्या आदल्या रात्री इमारतीत कुणी कुणी प्रवेश केला हे तपासण्यासाठी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून रजिस्टरही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

तीन तासाच्या तपासणीनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पून्हा वांद्रे पोलिस ठाणे गाठतं सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेला पंचनामा आणि व्हिडिओ तपासून पाहिल्याचे कळते. आत्महत्येच्या वेळी कुठली वस्तू कुठे आहे. याचे पोलिसांनी निरीक्षण केल्याचे कळते. त्याच बरोबर घटनास्थळी उपस्थित असलेले सुशांतचा मित्र सिद्धार्थ पठानी आणि कूक नीरज यांची सीबीआयने सुशांतच्या घरातच चौकशी केली. तसेच त्यांनी दिलेली सीबीआयला माहिती आणि पोलिसांना दिलेली माहिती यात फारकत आहे का तेही पडताळले.

पुढील बातमी
इतर बातम्या