'चायनीज' खाताय, मग जरा साभाळून; आरोग्यासाठी ठरू शकतं घातक

आपण कुठे फिरण्यासाठी घराबाहेर पडलो आणि यादरम्यान भूक लागल्यास अनेक जण स्ट्रीट फूड खाणं पसंत करतात. यामध्ये, वडापाव, बर्गर, चायनीज अशा बऱ्याचं खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मात्र बहुतांश लोक ही चायनीजवर ताव मारतात. परंतू, तुम्हा घराबाहेर पडल्यावर चायनीज खात आहात का? खात असाल तर सांभाळून. कारण सध्या चायनीजमध्ये चायनीज पदार्थासाठी मृत, कुजलेल्या कोंबड्यांचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं चायनीज खाणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं.

नेमकं कुठे घडला हा प्रकार

मुंबईतील नळबाजार इथं अशा प्रकारे मेलेल्या, कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएनं जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळते. या कारवाईअंतर्गत बुधवारी एफडीएने जे. जे. पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. नळबाजारमधील या धक्कादायक प्रकारानंतर आता मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईत दोषींविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील रस्त्यावरील चायनीज स्टॉल आणि उपाहारगृहांमध्ये बनविण्यात येणाऱ्या चायनीज पदार्थासाठी मृत, कुजलेल्या कोंबड्यांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. अशा ठिकाणी मांसाहारावर ताव मारणाऱ्या खवय्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मेलेल्या, कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार खाण्यासाठी जिवंत कोंबड्यांचाच वापर करणं बंधनकारक आहे. मुंबईत नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून कोंबड्या आणल्या जातात. मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात काही कोंबड्यांचा मृत्यू होतो. मृत कोंबड्यांची महापालिकेच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावणे विक्रेत्यांना बंधनकारक आहे.

पण प्रत्यक्षात मुंबईतील कोंबडी विक्रेत्यांकडून या नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. एफडीएनं यापूर्वी अनेकवेळा कोंबडी विक्रेते आणि मेलेल्या, कुजलेल्या कोंबड्यांची बेकायदा विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. पण तरीही ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेलेल्या, कुजलेल्या कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावता विक्रेते त्या दुकानाबाहेर फेकून देतात. काही नागरिक फेकलेल्या कोंबड्या जमा करून गोणीत भरून आसपासच्या चायनीज स्टॉलधारकांना, छोट्या उपाहारगृहांना स्वस्तात विकतात असल्याची समजतं. अशा कोंबड्यांचं सेवन करणं मानवी आरोग्यास घातक असते. या कोंबड्यांच्या सेवनामुळं कर्करोगासारखा जीवघेणा आजार होत असल्याचे अनेक संशोधनातून उघडकीस आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या