विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी होणार

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • क्राइम

मुंबईतील एसआरएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सेवा निवृत्तीच्या अखेरच्या कालावधीत मान्यता दिलेल्या १३७ प्रकरणांपैकी ३३ प्रकरणात गैरप्रकार आणि अनियमितता आढळून आली आहे. यासंदर्भात त्यांची गुन्हे अन्वेषण विभागमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी होणार असं सांगितलं.

म्हणून पाटील गोत्यात आले

विश्वास पाटील यांनी एसआरएच्या सीईओपदावर असताना शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात फायली हातावेगळ्या केल्याने, त्याची चौकशी सुरू होती. असं असतानाच दोन विकासकांना नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याच्या प्रकरणात पाटील गोत्यात आले.

रामजी शहा आणि रशेस कनकिया या दोन विकासकांच्या मालाडमधील प्रकल्पांना पाटील यांनी नियम मोडून अधिकाराचा दुरुपयोग करत मदत केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर चालू असलेल्या या आरोपांची फाईलच गहाळ झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. त्यासंदर्भात निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या