सराईत गुन्हेगार अटकेत

चेंबूर - खंडणी, चोरी, लूट आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखा 6 च्या अधिकऱ्यांनी सोमवारी अटक केली. या आरोपींवर टिळकनगर आणि देवनार पोलीस ठाण्यात सात ते आठ गुंन्हे दाखल होते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून दोघेही पोलिसांच्या तावडीत येत नव्हते. चेंबूर गुन्हे शाखा युनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ घुगे यांना या आरोपीबाबत माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून अरविंद सौदा (35) आणि किरणसिंग राजपूत (26) या दोन सराईत आरोपीना अटक केली.

पुढील बातमी
इतर बातम्या