भारताची अग्रगण्य देशांच्या यादीत नोंद व्हावी, यासाठी एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहारांसाठी आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र सायबर सुरक्षेच्या आघाडीवर मात्र कमालीची अनास्था दिसून येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सायबर पोलिसांची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यावेळी भविष्यातील आव्हानांचा विचार न केल्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात आज असंख्य अडचणी येत आहेत.
वाढत्या सायबर गुन्ह्यांमध्ये रॅन्समवेअर्स व्हायरसद्वारे हल्ला करण्यात आल्याच्या प्रमाणात २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. भारतासह १००हून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले आहेत. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने जीवनाला गती दिली असली, तरी त्यासोबत नव्या गुन्हेगारीलाही जन्म दिला. याची सर्वाधिक झळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बसत आहे.
भारताने टप्प्याटप्प्याने स्वीकारलेल्या मुक्त आर्थिक धोरणांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानासह सगळ्याच गोष्टी भारतीयांच्या वाट्याला येऊ लागल्या आहेत. विकास दर वाढून भारताने तंत्रज्ञानात मोठ्याप्रमाणात आघाडीही घेतली. त्यामुळेच अवघ्या काही वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आणि इथूनच भारतावर सायबर गुन्हेगारांनी विविध पद्धतीने हल्ला करण्यास सुरुवात केली.
भारतात आता मोठ्याप्रमाणात सायबर गुन्हेगारांकडून सरकारी, संशोधनपर संस्था यांची संकेतस्थळं हॅक करून माहिती चोरण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध, महत्त्वाच्या व्यक्तींच्या बँक खात्यातून इंटरनेटच्या सहाय्याने लाखो रुपये पळवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. ऐवढ्यावरच न थांबता हे सायबर चोरटे आता सर्वसामान्यांनाही लक्ष करू लागले आहेत. भविष्यात हे आव्हान अधिकाधिक कठीण होणार आहे, यात संशय नाही.
१७ मे २०१७ रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर रेन्समवेअर्स व्हायरसचा हल्ला
वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबईत चार सायबर पोलिस ठाणे उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याला वर्ष उलटले. वांद्रे येथे या पोलिस ठाण्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आली. तरी नव्या सायबर पोलिस ठाण्याचा अद्याप पत्ताच नाही. त्यासाठी १८६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. चार सायबर सेलसाठी दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, २४ पोलिस निरीक्षक, ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि १२० पोलिस शिपायांची नवीन पदं निर्माण करण्यास गृह विभागाने मान्यता दिली. नवीन पदांच्या निर्मितीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी १४ कोटी ५९ लाख ५६ हजारांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
संगणकाप्रमाणेच मोबाइलवरील हल्लेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २०१६च्या पहिल्या तिमाहीत क्विकहिलच्या प्रयोगशाळेत १७८ नवे मालवेअर्स आढळून आले. हे मालवेअर्स पसरण्याचं प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्येही रॅन्समवेअर्सचाही समावेश आहे.
नोटिफिकेशन बारमध्ये जाहिराती दाखवतात. अनेक मालवेअर्स आपल्या मोबाइलमधील यंत्रणेचा वापर बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जी क्रिया निवडतो ती न होता वेगळंच काही तरी होतं. मोबाइल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून अनेकदा रॅन्समवेअर्स आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात
हेही वाचा -
वाशीच्या एमजीएम रुग्णालयावर सायबर चोरट्यांचा हल्ला
बँकेतील महिलाच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, १ लाखाला गंडवलं