ड्रग्ज तस्कराचा पर्दाफाश, वांद्रेतून एमडी आणि कोकेनची तस्करी

मुंबईत सुशांत सिंह राजपूत प्रकरणा अमली पदार्थ तस्करीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर पोलिस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तस्करांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका तस्कराला मुंबई पोलिसांच्या डी.एन.नगर पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २ लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ८० हजारांचे कोकेन हे ड्रग्ज हस्तगत केले आहेत. महाविद्यालयीन तरुणांना हे ड्र्ग्ज तो देण्यासाठी आला असल्याचे समजते. या प्रकरणी डी.एन.नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- दुकानदारांना बोलण्यात गुंतवून, ज्वेलर्समद्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात अनेक बड्या सेलिब्रिटिंची नावे पुढे आल्यानंतर पोलिस आणि एनसीबीने त्यांची चौकशीही केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली. मुंबईतील महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असल्याने पोलिसांनी महाविद्यालयीन परिसरात लक्ष केंद्रीत केले. अशातच एक जण महाविद्यालयीन तरुणांना एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज देण्यासाठी येणार असल्याची माहिती डी.एन.नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी वांद्रे येथील बर्फिवाला विद्यालय बस स्टाँपजवळ आब्बास मोईन शेख हा ड्रग्ज तस्करीसाठी आला होता. पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ २ लाख २० हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ८० हजार रुपयांचे कोकेन आढळून आले.

हेही वाचाः- दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू इमारतींमध्ये फोफावतोय कोरोना

मुंबईत ड्रग्ज तस्करांची उलबांगडी सुरू केल्यानंतर तस्करांनी नवी मुंबई, गुजरात मार्गे ड्रग्ज आणणाऱ्या तस्करांनी आता हैद्राबात मार्गे ड्रग्ज आणण्यास सुरूवात केली. आब्बासच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आहे. न्यायालयाने आब्बासला ९ आँक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आब्बास हा फक्त मोहरा असून त्यामागील मुख्यसूत्रधार हा वेगळाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.  

पुढील बातमी
इतर बातम्या