नातेवाईकांना बनावट पावत्यांच्या मदतीनं ८७ कोटींच्या मनी लॉड्रिंगसाठी मदत करणाऱ्या दुबईच्या ४१ वर्षीय व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (डीआरआय)ने हैदराबादहून अटक केली आहे. शुभम सचदेवा असं अटक आरोपीचं नाव आहे.
दोन वर्षांपूर्वीच या व्यावसायिकाविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. मात्र डीआरआयची नजर चुकवून व्यावसायिक वावरत होता. अखेर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी एलओसीच्या मदतीनं त्याला पकडून डीआरआय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.
संपूर्ण प्रकार
शुभम सचदेव याची दुबईत ईएससीओआरपी कमोडीटीज नावाची कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी शुभमने मुंबईतील नातेवाईक नमित सोनी याला मोठ्या रक्कमेच्या असंख्य पावत्या दिल्या होत्या. नमितची नामको इंडस्ट्रिज कंपनीनं स्वीडनहून १५ कोटी रुपयांची मशीन आयात केली होती. ही मशीन सचदेवच्या कंपनीकडून घेण्यात आल्याचा कागदोपत्री व्यवहार या दोघांनी दाखवला होता. त्यासाठी सचदेवने नमितला पावतीवर १०२ कोटी रुपयांची रक्कम वाढवून दाखवली होती.
कालांतराने व्यवसायात झालेलं नुकसान पुढे करत सोनीने कंपनी तोट्यात असल्याचं दाखवल्यानंतर ८७ कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याची माहिती पुढे आली. हा प्रकार पुढे आल्यानंतर सचदेवला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं. मात्र व्यवसाय आणि कौटुंबिक कारण देत सचदेव दुबईहून येण्यास टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्या विरोधात डीआरआयने लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानंतर तो विविध मार्गाने भारतात येत असला तरी डीआरआय अधिकाऱ्यांच्या हाती लागत नव्हता.
अखेर त्याला ताब्यात घेतलं
दरम्यान कुटुंबासह सचदेव तिरुपतीच्या दर्शनासाठी सिंगापूरहून हैदराबाद विमानतळावर उतरला असता सचदेव विरोधात मनी लॉन्ड्रिग प्रकरणी लूकआऊट नोटीस असल्याचं पुढे आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी याबाबतची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी त्याचा ताबा घेतला.