रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

जोगेश्वरी पश्चिम - अंधेरी आरपीएफने बहरामबागच्या शक्तीनगर शॉप नं. 95 या पांडेय एंटरप्राइसेस दुकानावर मंगळवारी छापा घातला. या छाप्यात काळाबाजार करण्यासाठी ठेवण्यात आलेली रेल्वेची 4 इ-तिकिटं जप्त करण्यात आली. चौकशी दरम्यान दुकानमालक भ्रमप्रकाश गिरीजाशंकर पांडेय अनेक वर्षांपासून तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचं समोर आलंय. त्याचा साथी रितेश गुप्ता फरार असून त्याचा पोलीस तपास घेत आहेत. हे दोघं बनावट यूझर आयडी बनवून रेल्वेचं इ-तिकिट काढून विकायचे. मूल्यामेक्षा 200 ते 300 रुपये जास्त पैसे आकारून ही तिकिटं विकण्यात येत होती.

पुढील बातमी
इतर बातम्या