शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग

कुर्ला - शॉर्ट सर्कीटमुळे कुर्ला पश्चिम इथल्या एसआरए इमारतीच्या बाराव्या मजल्यावर बुधवारी सायंकाळी आग लागली होती. बैलबाजार रोड परिसरात ही एसआरएची सहाव्या नंबरची ही इमारत आहे. सायंकाळी सातच्या सुमारास याठिकाणी आग लागली. ज्या घरात ही आग लागली तिथं एक महिला आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा होता. रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलानं सीडीच्या मदतीनं या दोघांना सुखरूप बाहेर काढलं. यामध्ये कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलानं दिलाय. 

पुढील बातमी
इतर बातम्या