महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक

व्यायाम प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी (Mumbai police) महीलेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भादवि 354 नुसार गुन्हा नोंद करून जिम प्रशिक्षकाला अटक केली आहे.

चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा व्यायाम शाळेत व्यायाम शिकवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. 25 वर्षीय महिला व्यायाम करण्यासाठी आले असता आरोपीने व्यायाम प्रशिक्षणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीने असा स्पर्श करण्यात विरोध देखील दर्शवला होता मात्र आरोपीकडून पुन्हा पुन्हा स्पर्श केल्याने त्या विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. महिलेची तक्रार प्राप्त होताच चारकोप पोलिसांनी व्यायाम प्रशिक्षका विरोधात गुन्हा नोंद करून त्याला आता अटक देखील करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनरच्या प्रॅक्टिसच्या नावाखाली महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करत होता, या महिलेने विरोध केला आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध अटक केली आहे.


हेही वाचा

महिलांच्या बाथरूममध्ये डोकावणाऱ्या आयआयटी बॉम्बे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला अटक

पुढील बातमी
इतर बातम्या