ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेता एजाज खानला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एजाज खानला बेलापूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केलं जा‌णार आहे.

नवी मुंबई पोलिसांची कारवाई

बेलापूरमधील के स्टॉर हॉटेलमध्ये काही जण अंमली पदार्थांची तस्करी करण्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई केली. त्यावेळी नशा करणाऱ्यांमध्ये एजाज खानही सामील होता. त्यानंतर पोलिसांनी एजाज खानसह त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. नवी मुंबईच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करत त्याला अटक केली. सध्या पोलिस त्याची चौकशी करत असून दुपारी दोन वाजता त्याला न्यायालयात हजर केलं जाईल.

चित्रपटांशिवाय मालिकांत केलं काम

बिग बॉसमुळे एजाज खान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने रक्तचरित्र, नायक आणि 'रब जैसी कई' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासोबतच बिग बॉसच्या सातव्या सिझनसहित करम अपना अपना, कहानी हमारे महाभारत की आणि रहे तेरा आशिर्वाद सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा - 

फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

पुढील बातमी
इतर बातम्या