मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर दगडफेक, तरुणी गंभीर जखमी

मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलवर गुरुवारी रात्री अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. कांचन विकास हाटले (२८) असं या जखमी तरुणीचं नाव आहे. गुरुवारी 4 ऑक्टोबरला रात्री 9 च्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडली.

कांचन गंभीर जखमी

कांचन हाटले ही दिवा येथे राहणारी असून मुलुंड येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान गुरुवारी रात्री कामावरून सुटल्यावर घरी जाण्यासाठी डोंबिवली लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होती. त्यावेळी लोकल ठाणे-मुंब्रा स्थानकाजवळ येताच अज्ञातांनी त्या लोकलवर दगडफेक झाली. दरम्यान लोकलवर भिरकावलेला दगड लागून कांचन गंभीर जखमी झाली.

तक्रार दाखल

यावेळी प्रथम श्रेणी डब्यात असलेल्या इतर प्रवशांनी कांचनला डोंबिवली स्थानकात उतरवून डॉ. हर्णे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी तातडीनं कांचनवर शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा - 

स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली

चोरट्या प्रवाशांमुळे रेल्वेचं ४ हजार कोटींचं नुकसान

पुढील बातमी
इतर बातम्या