धक्कादायक! CSMT- बदलापूर लोकलमध्ये नशेडी लेडिज डब्यात चढला आणि सिगरेट पेटवली, पुढे...

मध्य रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर लोकलमध्ये एका गरदुल्याने धुमाकूळ घातला. भायखळा रेल्वे स्थानकात हा तरुण महिलांच्या डब्यात चढला. विशेष म्हणजे सायंकाळी गर्दीच्या वेळेस हा सर्व प्रकार घडला आहे. 

सायंकाळी 7.15 मिनीटांनी सीएसएमटी स्थानकातून बदलापूर लोकल सुटली. ही लोकल भायखळा स्टेशनवर पोहचल्यानंतर  अचानक महिला डब्यात एक तरुण शिरला. हा तरुण गेटवर उभा राहून सिगारेट ओढत होता.

डब्यातील महिलांनी त्याला दादरला उतरायला सांगितले. परंतु दादर स्टेशन आलं तरी हा तरुण उतरला नाही. उलट या तरुणाने लोकल मध्ये चढणाऱ्या इतर महिलांना देखील अडथळा निर्माण केला. सदर तरुण हा अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

महिलांनी सांगून देखील हा तरुण महिला डब्यातून दुसऱ्या डब्यात गेला नाही. उलट या तरुणाच्या विचित्र वागण्यामुळे डब्यातील काही महिला घाबरल्या होत्या. काही महिलांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. अखेर रेल्वे पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकात या तरुणाला ताब्यात घेतले.

मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेले काही दिवस अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या