अभिनेत्री अक्षरा हसनचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर

शमिताभ या हिंदी चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री अक्षरा हसन हिचे खासगी फोटो सोशल मीडियावर लिक झाल्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली आहे. अक्षरा ही अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने याबाबतची माहिती देत अशा प्रकारची कृत्यं करणाऱ्यांवर टीका केली आहे. याप्रकरणी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडून तपास करत असल्याची माहितीही तिनेच तिच्या पोस्टमधून दिली आहे.

सायबर पोलिसांत धाव

शनिवारी अक्षरा ही तिच्या कामात व्यस्त असताना. तिच्या मित्रांकडून तिला तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती दिली. त्यानुसार तिने खात्री केली आणि तिच्या स्विय सहकाऱ्याच्या मदतीने सायबर पोलिसांत धाव घेत लेखी तक्रार नोंदवली. या घृणास्पद कृत्याबाबत तिने शनिवारी आपल्या ट्विटरवरून पोस्ट लिहून संताप व्यक्त केला होता.

काय म्हटलंय अक्षराने?

यावेळी तिने 'देशात #मीटू सारख्या चळवळीतून मुली व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुलींचे आक्षेपार्ह फोटोज लीक करून काही लोक विकृत आणि असुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे'. असल्याचं म्हटलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या