मालाड - बोरीवली, दिंडोशी, अंधेरी आणि वांद्रे इथल्या कोर्टातल्या वकिलांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले. कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक लांडगे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच रविवारी दिलीप गुप्ता या वकिलाच्या कानशिलात लगावत शिवीगाळही केली. त्या विरोधात या वकिलांनी आज कामबंद आंदोलन करत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासह ज्या अधिकाऱ्याने वकिलाच्या कानाखाली भडकावली त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी वकील डी. के. पांडे यांनी केली.
तर बोरीवली कोर्टातल्या वकिलांचं म्हणणं आहे की, पोलिसांची मनमानी सहन केली जणार नाही. याच्याविरोधात कोर्टात धाव घेऊ असा इशाराही दिला आहे. तसेच कुरार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली.
याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेले तिथे पोहचले. तेव्हा त्यांनी वकिलांशी बातचित करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं. त्यासह फिर्यादी वकील दिलीप गुप्ता यांचा जबाब देखील नोंदवून घेतला होता.