ट्रेनखाली उडी मारून एकाची आत्महत्या

टिळकनगर - येथील रेल्वे स्थानकावर एकाने आत्महत्या केलीय. टिळकनगर स्थानकावर बुधवारी सकाळी एका व्यक्तीने ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

२९ मार्चला बुधवारी सकाळी ७ वाजता एक व्यक्ती स्टेशनवर आली आणि त्याने अचानक ट्रेनखाली उडी घेतली. ही ट्रेन सीएसटीच्या दिशेने जात होती. ट्रेनखाली उडी मारणारी व्यक्ती कोण होती? हे अजून कळू शकलेले नाही. वडाळा जीआरपी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे ती व्यक्ती कोण आहे? याचा तपास करत आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या