काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकी देणारा गजाआड

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अहमदाबादच्या बावला परिसरातून अटक केली आहे. गिरीश माहेश्वरी असं या आरोपीचं नाव असून तो अजमेर येथील किशनगंज इथं राहणारा आहे.

कधी दिली धमकी?

काही दिवसांपूर्वी गिरीशनं सोशल मीडियावरून प्रियंका चतुर्वेदी यांच्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याचप्रमाणं दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती.

पोलिस कोठडी

पोलिस उपायक्त दीपक देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगांव पोलिसांनी आरोपी गिरीश याच्यावर भा.द.वि.च्या कलम ५०९, ५०६, ४६९ तसंच आईटी आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक केल्यानंतर गिरीशला दिंडोशी कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी त्याला १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


हेही वाचा-

बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?

अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण, कांबळीच्या पत्नीवर गुन्हा दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या