मुलीसोबत अश्लिल चाळे करणारा बाबा अटकेत

मानखुर्द - दर्ग्यात प्रसाद घेण्यासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या एका बाबाला तीन महिन्यानंतर मानखुर्द पोलिसांनी अटक केलीय. गुलाम रफिक शेख (६०) असं या बाबाचं नाव असून तो याच परिसरातील एका दर्गामध्ये राहतो. 6 सप्टेंबरला पीडित मुलगी प्रसाद घेण्यासाठी या दर्ग्यामध्ये आली होती. या वेळी बाबानं तिच्यासोबत अश्लिल चाळे केले होते. मुलीनं तिच्या आईला ही बाब सांगिल्यानंतर तिनं मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बाबाला याची माहिती मिळताच त्यानं मानखुर्दमधून पळ काढला होता. दरम्यान सोमवारी पहाटे हा आरोपी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

पुढील बातमी
इतर बातम्या