मरीन ड्राइव्ह छेडछाड प्रकरण: ५ जणांना अटक, दोघे अल्पवयीन

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्राइम

मरीन ड्राइव्ह इथं झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत पोलिसांनी शनिवारी ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. या ५ जणांपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. या दोघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मरीन ड्राइव्ह इथं तीन महिलांची अश्लील पद्धतीने छेडछाड केल्याबद्दल प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही तरूण तीन महिलांची छेडछाड करत होते. यावेळी श्राॅफ नावाच्या एका व्यक्तीने मध्ये पडत या तरूणांना रोखल्यावर सर्वजण पळून गेले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास करून सर्वांना पकडलं.

प्रेम निकाळजे (२१), जगमोहन प्रसाद (२१), विकास चौरसिया (२१) असे तिघेजण आणि दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींविरोधात ३५४, ५०९, १४३, ३४२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या