इमारतीचा भाग कोसळून दोन जखमी

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वांद्रे - पूर्व भागातील बेहरामपाडा परिसरातल्या एसआरएच्या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. मलब्याखाली निसार खान यांच्या कुंटुंबातले सात जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात महिला आणि लहान मुलं असण्याचीही शक्यता आहे. तर एक महिला आणि दहा वर्षांच्या मुलीला गंभीर इजा झाल्यानं भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. अग्निशामन दलाच्या पाच गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या