मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - गणेश विसर्जनादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भक्तांचे मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा काळाचौकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह 18 जणांना अटक केली आहे.

अनंत चतुर्दशी दिवशी लालबाग परिसरातून तब्बल १३१ मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले होते. लालबाग परिसरात झालेल्या मोबाईल चोऱ्यांप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सूरत गॅंगच्या ९ जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून टवेरा गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. त्याबरोबरच आणखीनही ९ मोबाईल चोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. मोबाईल चोरीबरोबरच काळाचौकी परिसरात १२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अंजली नायडू नावाच्या महिलेला अटक केली आहे. या सगळ्यांना पोलिसांनी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या