अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

प्रेयसीला मारहाण करून फरार झालेला अभिनेता अरमान कोहली याला अखेर पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. निरू रंधवा हिला गंभीर मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अरमान कोहलीविरुद्ध प्रेयसी निरूने तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी निरूला अंधेरीच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

मारहाण केल्याप्रकरणी तक्रार

सांताक्रूझ पोलिस ठाण्यात निरुने मारहाण केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. यातक्रारीमध्ये अरमानने आपल्याला केसाला धरून मारहाण केली. तसंच पायऱ्यांवरून खाली ढकललं आणि डोकं भिंतीवर आदळल्याचं निरूनं सांगितलं होतं.

का केली होती मारहाण?

काही वर्षांपूर्वी अरमान आणि निरू या दोघांची दुबईतील एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे सांताक्रूझ परिसरात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गोवा येथे असलेली संपत्ती भाड्यावर देण्यावरून या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

याच कारणावरून रविवार ३ जून रोजी या दोघांमध्ये भांडण झालं होतं. या भांडणानंतर अरमानने प्रेयसी निरूला मारहाण केली. या मारहाणीत निरुचं डोकं भिंतीवर आदळल्याने तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे निरूला अंधेरीतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


हेही वाचा-

व्यावसायिकाच्या अाॅफिसमध्ये चोरी, तिघांना अटक

सलमान खानला भेटण्यासाठी गाठली मुंबई


पुढील बातमी
इतर बातम्या