हायप्रोफाइल सेक्स रॅकेटप्रकरणी एकाला अटक

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका हाॅटेलवर छापा टाकत रजनीश सिंग या एजंटसह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावेळी तीन मुलींची सुटकाही करण्यात आली. 

वृत्तपत्रात जाहिरात

मुंबईतील नामांकित हाॅटेलमध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार हे सेक्स रॅकेट रजनीश चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. त्याने शहरातील नामांकित वृत्तपत्रातही  spa @your home या नावाने जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीद्वारे तो फोनवर ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून मागणीनुसार मुली हाॅटेलवर बुक केलेल्या खोलीवर पाठवायचा. 

पेनीनसुला ग्रँडमध्ये सेक्स रॅकेट

रजनीश साकिनाकाच्या पेनीनसुला ग्रँड हाँटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन मुलींची सुटका करत रजनीशला अटक केली. पोलिसांनी१० मोबाइल, ४ लाख ७० हजाराची रोकड आणि काही औषधसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

धारावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या