९३ च्या स्फोटातील आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसा याला गुजरात एटीएसने सहार विमानतळावरून अटक केली आहे.मुनाफला दीड हजार कोटीच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुजराज पोलिसांनी मागच्या वर्षी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर प्रवास करत होता. जवेरी बाझार येथील स्फोटात त्याचा हात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. जामीनावर मुक्त झाल्यापासून मुसा फरार होता. 

 १९९३ च्या स्फोटात मुसाला जवेरी बाजार येथे घडवण्यात आलेल्या स्फोटासाठी त्याने  स्कूटर पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. यातील एक स्कूटरचा स्फोट झाला. आणि इतर दोन स्कूटर मुंबईच्या नैगम क्रॉस रोड आणि दादर येथे मिळून आली होती. अवघ्या दोन तासात मुंबईच्या १२ ठिकाणी १९९३ मध्ये साखळीस्फोट घडवण्यात आले होते. यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन यांचा हात असल्याचे चौकशीतून पुढे आले होते. या स्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जखमी होऊन त्यांना कायमचे अंपगत्व आले होते. या गुन्ह्यांत अनेकांना ताडा कोर्टाने दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणा टायगर मेननचा भाऊ याकूब मेनन याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारी पर्यंत कस्टडी सुनावली आहे

पुढील बातमी
इतर बातम्या