शौचालयात सापडलं बेवारस अर्भक

मुलींची हत्या थांबवण्यासाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी सामाजिक संस्था देखील कार्यरत आहेत. तरीही आज देखील स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.

कांजूरमार्गमध्ये शनिवारी एक दिवसाच्या स्त्री जातीचे अर्भक एका शौचालयात सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पहाटेच्या दरम्यान कांजूर पोलिसांना हनुमान गल्लीजवळ असलेल्या एका शौचालयात एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार कांजूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक शौचालयात कसे आले? याचा शोध पोलास घेत आहेत.

सध्या या अर्भकाला सायन रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

- अजिनाथ सातपुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पुढील बातमी
इतर बातम्या