मुंबईत अनेक ठिकाणी NIAची छापेमारी, दाऊदच्या संबंधितांवर कारवाई

केंद्रीय तपास यंत्रणा NIA नं डी कंपनीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईत 20 ठिकाणी एनआयएनं छापेमारी करण्यात आली आहे. दाऊदशी संबंधित अनेक जणांवर एनआयएचे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांच्या 20 हून अधिक ठिकाणांवर एनआयएकडून छापे टाकले आहेत.

मुंबईच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारात छापेमारी सुरु झाली आहे. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग स्मगलर आणि असे अनेक लोक आहेत.

NIA नं दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, जावेद चिकना, इकबाल मिर्ची आणि इतर लोकांसोबत दाऊदनं आपलं नेटवर्क उभं केलं होतं. हे लोक व्यावसायिकांना टार्गेट करायचे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एका वाहिनीला सांगितलं की, भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी आम्हाला मिळाली होती. त्यावरुनच कारवाई करण्यात आली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या