कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोचे मालक युग पाठकला अटक

अग्निशमन विभागाच्या चौकशी अहवालात कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली आग मोजोस बिस्ट्रो पबमधून सर्वत्र पसरल्याचं स्पष्ट झाल्यावर ना. म. जोशी पोलिसांनी या पबचे मालक ड्युक तुली आणि युग पाठक या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल करत युग पाठक याला अटक केली आहे.

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेली आग नेमकी कुठून आणि कशामुळे लागली, या कारणांचा अग्निशमन दलाने शोध घेतल्यानंतर ही आग सर्वात पहिल्यांदा मोजोस बिस्ट्रोमध्ये लागली आणि तिथून ती वन अबोव्हपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं. तसा चौकशी अहवाल अग्निशम दलाने महापालिका आयुक्तांना सादर केल्यानंतर पोलिसांनी 'मोजो बिस्ट्रो'चे मालक युग पाठक आणि आणि युग तुली यांच्यासह पबच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीन आरोपींपैकी पोलिसांनी युग पाठक याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद

याअगोदर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी युग तुली आणि युग पाठक यांना बोलावून घेत त्यांचे ४ पानी जबाब नोंदवून घेतले होते. मात्र अग्निशमन विभागाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलत या दोघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. या दोघांविरोधातील मागील एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा-

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!

कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वन अबोव्हच्या फरार मालकांवर १ लाखांचं इनाम


पुढील बातमी
इतर बातम्या