चेंबूर परिसरात टँकरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. नरेश काकरे असं या मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसानी टँकर चालक उमेश विश्वनाथ यादव (२८) याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती गुन्ह्याची नोंद केली आहे.
टँकरवरील नियंत्रण सुटले
चेंबूरच्या कुंभारवाडा परिसरातील व्ही.एन. पुरव मार्गावर नरेश हे पत्नी विद्या, सासू शांताबे, मुलगी अनुष्का आणि ध्रुवीसोबत राहत होते. गुरूवारी सायंकाळी नरेश हे पत्नी विद्यासोबत चेंबूर येथील प्रसिद्ध साईबाबा मंदीरात दर्शनासाठी गेले होते. नरेश आरसी रोडहून दुचाकीने परत घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी भरधाव वेगात टँकर चालवत असलेल्या उमेश यादव याचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकरने नरेश यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात विद्या गंभीर जखमी झाल्या. तर नरेश जागीच बेशुद्ध पडले. दोघांना स्थानिकांनी राजावडी रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी नरेश यांना तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा -
पार्किंग वादातून १ वर्षाची शिक्षा
पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण