जोगेश्वरीत तरुणीची आत्महत्या

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

जोगेश्वरी - आई-वडिलांनी प्रेमप्रकरणास केलेल्या विरोधामुळे एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 डिसेंबरला जोगेश्वरीच्या रामनगर परिसरात घडलीये. तिचं नाव स्नेहल राणे आहे. आई-बाबा लग्नासाठी आणि धाकटी बहीण मंगल कॉलेजला गेली असताना स्नेहलनं गुरुवारी दुपारी माळ्यावरील पंख्याला गळफास लावून घेतला. सायंकाळी मंगलनं दार वाजवूनही कुणीच न उघडल्यानं शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा स्नेहल पंख्याला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली.

वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार

प्रेमप्रकरणाला घरच्यांकडून असलेल्या विरोधातून हे पाऊल उचलल्याचं तिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलंय. स्नेहलचं वैभव फेफडे या तरुणावर प्रेम होतं. पण स्नेहलचे आई-वडिल तिच्या लग्नासाठी दुसरा मुलगा बघत होते, जे स्नेहलला अमान्य होतं. सध्या वैभवच्या आई आणि भावाची चौकशी पोलिसांनी केली आहे. स्नेहलच्या आई-वडिलांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. जोगेश्वरी पोलिसांनी स्नेहलचा मृतदेह 2 डिसेंबर रोजी सकाळी शवविच्छेदनासाठी पाठवला असून तिचं मोबाइल आणि फेसबुकवरील संभाषणही वनराई पोलीस तपासत आहेत.

दरम्यान स्नेहलने आत्महत्या केल्यानंतर वैभव फरार होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी वैभवची चौकशी सुरु आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या