किर्ती व्यासच्या हत्येप्रकरणी २ सहकाऱ्यांना अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

अभिनेता फरहान अख्तर शोधत असलेल्या किर्ती व्यास या २८ वर्षीय तरूणीच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. सिद्धेश चवणकर आणि खुशी साजवाणी अशी या दोन अटक आरोपींची नावे आहेत. कामचुकार सहकाऱ्यांना किर्तीने दटावल्याच्या रागातून त्यांनी किर्तीचं अपहरण करून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात पुढं आलं आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कामचुकारपणा करण्यात पुढं

अभिनेता फरहान खानची पूर्वीची पत्नी अनुधा हिच्या अंधेरी पश्चिमेकडील 'बि ब्लंट' या कार्यालयात फायनांन्स मॅनेजर म्हणून किर्ती कामाला होती. या कार्यालयात सिद्धेश अकाऊंट एक्झिक्युटीव्ह आणि खुशी अॅकॅडमी मॅनेजर म्हणून कामाला होती. ही दोघंही कामचुकारपणा करत असल्याने किर्तीने दोघांना १६ मार्चपर्यंत कामात सुधारणा करण्याची नोटीस पाठवली होती.

आॅफिसला सोडण्याचा बहाणा

दरम्यान १६ मार्च रोजीच सिद्धेत किर्तीला तिच्या राहत्या घराखाली ग्रँटरोड इथं भेटला. किर्तीला आॅफिसला सोडतो असं सांगून त्याने तिला गाडीत बसवलं. हे दोघेही नवजीवन जंक्शनपर्यंत एकत्र असल्याचं सीसीटीव्हीत समोर आलं आहे. मात्र त्यानंतर किर्ती बेपत्ता झाली.

गाडीत रक्ताचे डाग

याबाबत अभिनेता फरहान अख्तरने ट्विरटवर किर्तीच्या बेपत्ता होण्याबाबतचं ट्विट केल्यानंतर पोलिस किर्तीचा शोध घेऊ लागले. याच दरम्यान पोलिसांनी किर्तीच्या कार्यालयात काम करत असलेल्या सिद्धेशची चौकशी केली. तसंच त्याच्या गाडीची झडती घेतली असता. गाडीत्या डिकीत रक्ताचे डाग आढळून आले. या रक्ताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी किर्तीच्या आईवडिलांचे रक्ताचे नमुने तपासले असता. ते रक्त किर्तीचंच असल्याचं निष्पन्न झालं.

त्यानुसार पोलिसांनी हत्येचा कट, अपहरण आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी किर्तीचे सहकारी सिद्धेश आणि खुशीला पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा-

इंटरनेटवरून मुलींचा पाठलाग, गुगलच्या कर्मचाऱ्याला अटक

पत्नीच्या हत्येनंतर चोरीचा बनाव


पुढील बातमी
इतर बातम्या