प्रोड्युसरकडे खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक

प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील प्रोड्युसरकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अटक केली आहे. रोहन अशोक रेडेकर, शशांक वर्मा, भूपेशकुमार प्रसाद अशी या तिघांची नावे आहे. यातील एक आरोपी हा मुंबईतील प्रसिद्ध राजकीय नेत्याचा भाचा असल्याचं बोललं जातं. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

गोराई परिसरातून अटक

मालाडच्या बांगूरनगर परिसरात राहणाऱ्या प्रोड्युसरकडे हे तीन ही आरोपी मागील अनेक दिवसांपासून खंडणीसाठी फोन करत होते. एका कुख्यात गुंडाच्या नावाने ते वारंवार प्रोड्युसरला धमकावत होते. तसंच पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होते. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्या प्रोड्युसरने गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांची मदत घेतली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना गोराई परिसरातून अटक केली. यातील एक आरोपी हा प्रसाद हा पूर्वी त्या प्रोड्युसरकडे कामाला होता. आर्थिक देवाण घेवाणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने संबंध बिघडलेले होते. त्यामुळेत प्रसादने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने प्रोड्युसरला त्रास देण्यास सुरूवात केली. यातील शशांक हा एका बड्या राजकीय नेत्याचा भाचा असल्याचॆ तपासात पुढे आले आहे. हे तिघेही मालाड परिसरातील रहिवाशी आहे.


हेही वाचा -

'डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार' – गिरीश महाजन

फेसबुकवर कर्ज देण्याची पोस्ट टाकून फसवणूक, दोघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या