काँग्रेसचा पदाधिकारी बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

ताडदेव - काँग्रेस जिल्हा अध्यक्षाविरुद्ध ताडदेव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 30 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मंदार पवार (40) या पदाधिकाऱ्याला शनिवारी अटक करण्यात आली. लग्नाचं आमिष दाखवून पवारने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप तरुणीने केलाय. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ती शुक्रवारी सुरुवातीला व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यासाठी गेली असता रात्री आठवाजेपर्यंत तिची तक्रार घेतली नाही. मात्र शनिवारी ताडदेव पोलीस ठाण्यात पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली, असं ताडदेव पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांने सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या