अनधिकृत टपऱ्यांवर पोलिसांची कारवाई

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - संगमनगर इथल्या एस पी रोड परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्यांवर टी टी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केलीय. तसंच सामान जप्त करत दुकान मालकांनाही अटक केलीय. अनधिकृत दुकानांवर कारवाई केल्यानं रस्ता मोकळा झालाय. त्यामुळे परिसरातल्या रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

टपऱ्या चालवणारे रहिवाशी स्थानिक गुंड असल्यानं सर्वसामान्य नागरिक आणि पालिका अधिकारी यांच्या दादागिरी समोर हतबल झाले होते. या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाईसाठी पालिका पुढे येत नसल्यानं रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या