दहीसर चेकनाक्यावर पकडला लाखोंचा गुटखा

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

दहिसर – दहीसर चेकनाक्यावर शनिवारी पोलिसांनी लाखोंचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून, पुढील कारवाई अन्न आणि औषध प्रशासनावर सोपवली आहे. एका टेम्पोतून लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती दहिसर पोलीस चेकनाक्यावरील पोलिसांना मिळाली. चेकनाक्यावर टेम्पो येताच पोलिसांनी तपास केला असता त्यांना MH 02 CD 9360 या टेम्पोमध्ये लाखोंचा माल सापडला. दरम्यान, या प्रकरणी टेम्पो चालकाकडून पोलीस अधिक तपास करत आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या