पोलिस निरीक्षकाला २२ लाखांची लाच घेताना अटक

वाईन शाॅपवर कारवाई न करण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अनंत सिताराम भोईर या लाचखोर पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या गुन्हे शाखा १० युनिटमध्ये कार्यरत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

२५ लाखांची मागणी

अंधेरी परिसरात तक्रारदार यांचं वाईन शाॅप आहे. या वाईन शाॅपच्या मालकाला मागील अनेक दिवसांपासून भोईर हे लाच मागत होते. दुकानात बनावट दारू विकत असल्याच्या गुन्ह्यात अटक करण्याची भिती दाखवत होते. भोईर हे २५ लाख रुपयांची लाच मागत होते. मात्र लाच देण्याची तयारी नसलेल्या मालकाने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भोईर यांची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपतने सापळा लावला. 

एमआयडीसी परिसरात अटक

वाईन शाॅप मालकाने २२ लाख देण्याची तयारी दर्शवत अंधेरी येथील एमआयडीसी परिसरात भोईर यांना बोलावले. भोईर पैसे स्विकारण्यासाठी खासगी गाडीतून आले असताना लाचेची रक्कम स्विकारताना भोईर यांना अटक केली. भोईर यांना ६५,४१, ४३, ९०, १०८ महाराष्ट्र दारू बंदी कायदा गुन्ह्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.


हेही वाचा - 

जोगेश्वरीत भरधाव कारनं तरुणीला उडवलं, तरूणी कोमात

"थर्टीफर्स्ट"च्या रात्री पोलिसांचीच बोट बुडाली, १ पोलिस जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या