कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 514 जागांसाठी भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 514 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य), आयुष वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय आदी पदे भरण्यात येणार आहेत. 

या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे, अशी जाहीरात महापालिकेकडून देण्यात आली आहे. या पदांसाठी मुलाखत 11 व 12 जून 2020 रोजी होणार आहे. इच्छुकांनी पालिकेच्या वेबसाईटवर सेवा भरती या पर्यायावर क्लिक करून यादी असा पर्याय क्लिक करावा. याठिकाणी भरतीची माहिती इच्छुकांना मिळेल.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णांलयीन सेवेसाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे वरील पदांची तात्पुरत्या / अस्थायी स्वरुपात कंत्राट पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य), आयुष वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, वार्ड बॉय

पद संख्या - 514 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण - कल्याण

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)

मुलाखतीची तारीख - 11 व 12 जून 2020


हेही वाचा -

राज्यात २५५३ नवीन रुग्णांची नोंद, तर दिवसभरात १०९ जणांच्या मृत्यूची नोंद

कोरोनाने मृत्यू झाल्यास मुंबई महापालिका कामगारांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई



पुढील बातमी
इतर बातम्या