मुंबईत ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त

मुंबईकरांसाठी एक महत्वाती बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)कडून भेसळयुक्त दुध जप्त करण्यात आलं आहे. एफडीएनं सांताक्रूझ इथं छापा टाकून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केलं. या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे.

एफडीएच्या मुंबई विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथील मेसर्स नागराज सैदालु मेडाबोनिया, रूम नंबर ३२, वाकोला ब्रिज, लोखंडवाला चाळ येथे १७ मार्चला छापा घातला. येथून ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.

या दुधाची किंमत २६ हजार ९२२ रुपये आहे. होमो पास्ट टोण्ड मिल्क (गोवर्धन फ्रेश), पास्ट डबल टोण्ड मिल्क (गोवर्धन टी स्टार) आणि पास्ट होमो काऊ मिल्क (गोवर्धन गोल्ड) दुधाचा यात समावेश आहे.

दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या पुन्हा बंद करून भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मिळते. दरम्यान जप्त दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या