चार आरोपी गजाआड

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

समतानगर - दिवाळीच्या दिवशी 31 ऑक्टोबरला कांदिवली पूर्वेच्या हनुमाननगरमध्ये प्रशांत अहिरे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. यामध्ये फरार असलेले सोनू जैसवाल (19) आणि आशुतोष चौधरी उर्फ रोशन (19) या आरोपींना पोलिसांनी 11 नोव्हेंबरला अटक केली. यापूर्वी पोलिसांनी मनोज कुमार भारती (19), दिनेश यादव (19) या दोन आरोपींना अटक केली होती. अशी माहिती समतानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी दिली आहे.

दिवाळीच्या रात्री सर्व आरोपी लक्ष्मीपूजनानंतर मद्य प्राशन करत बसले होते. त्यावेळी प्रशांत अहिरे तिथे आला आणि त्याने फक्त सोनूलाच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे इतर नाराज झाले. त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेल्या वादाचं रुपांतर मारहाणीत बदललं. त्यावेळी त्या सर्वांनी प्रशांतवर चाकू आणि दारुच्या बाटलीने 22 वार केले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यावेळी फरार झालेल्या सोनू आणि आशुतोषला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.   

पुढील बातमी
इतर बातम्या