चालत्या ट्रेनमध्ये मुलीचा लैंगिक छळ, तासाभरात आरोपी अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून धावत्या ट्रेनमध्ये कूलीने (पोर्टर) 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचा केला. बुधवारी घटनेच्या आठ तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात आले. आरोपिला गुरुवारनंतर शहर न्यायालयात हजर केले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यार्थिनी नवी मुंबईतील बेलापूर येथे परीक्षेसाठी जात होती आणि सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या महिलांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढली. त्या वेळी कोचमध्ये फक्त एक ज्येष्ठ महिला होती. जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा एका व्यक्तीने अचानक आत उडी मारली. त्यानंतर तो मुलीच्या जवळ गेला आणि तिच्याशी अंगलट करायला लागला.

डब्यात मुलीसोबत असणारी ज्येष्ठ महिला मुलीच्या मदतीला धावून आली. वृद्ध महिला पोलिसांना बोलावण्याची धमकी देऊ लगाली. तसेच आरडाओरडा करू लागली. ट्रेन मस्जिद स्थानकावर येताच मुलगी ट्रेनच्या बाहेर पळाली आणि जनरल डब्यात जाऊन बसली. आरोपी देखील तिथून पळून गेला. 

एका पुरुष सहप्रवाशाने मदतीसाठी जीआरपी हेल्पलाईनशी संपर्क साधला. ती खूप घाबरली तर होतीच थर थर कापत होती. 

दुपारनंतर पोलिस तक्रारीनंतर, मुंबई पोलिसांसह रेल्वे संरक्षण दल आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या पथकांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा नवाज करीम (४०) नावाच्या कुली या आरोपीचा माग काढला आणि त्याला पकडले.

पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीला नवी मुंबईतील सानपाडा येथील तिच्या परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एक पथक पाठवले, परंतु तिची परिस्थिती पाहता परीक्षकाने तिला दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्याची परवानगी दिली. 

नंतर, मुलीला पुन्हा सीएसएमटी येथे नेण्यात आले जेथे तिने औपचारिक तक्रार नोंदवली.

करीमच्या मागावर, जीआरपीच्या पथकांनी त्याला मस्जिद स्थानकाबाहेर पाहिले, त्याला पकडले आणि सीएसएमटी येथील जीआरपीच्या ताब्यात दिले. आरोपी, जो बिहारचा असल्याचे सांगितले जाते, त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. 


हेही वाचा

एसी लोकलचे बनावट तिकिट बनवणाऱ्याला अंधेरीत अटक

मनोज साने 'सेक्स अॅडिक्ट'; पॉर्न व्हिडिओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

पुढील बातमी
इतर बातम्या