शॉर्टसर्किटमुळे आग

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

सँडहर्स्ट रो़ड - नागपाडा परिसरातील पिरखान स्ट्रीट 2 वरील मुस्तफा मंझिल या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील पॅसेजमध्ये आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

सकाळी पावणे अकराच्या सुमारास स्विचबोर्डमधून धूर येऊ लागला आणि काही वेळातच त्या बोर्डालगतच्या कचऱ्याच्या डब्यांना आग लागली आणि पाहता पाहता आग चौथ्या मजल्यावरील काॅरिडोरपर्यंत गेली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही, असं अग्निशमन दलाचे प्रताप भोसले यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या