शॉर्ट सर्किटमुळे चाळीला आग

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

लोअर परेल - फिनिक्स टॉवरच्या समोरील खिमजी नागजी चाळ क्रमांक 4 ला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी घडलीय. ही आग बाजूच्या घरात पसरत गेल्याने दोन सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. मात्र चाळीच्या प्रवेशद्वाराजवळ खूप अडचण आणि बांधकाम असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना थोड्याफार अडचणी आल्या. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांना अखेर यश आले.

पुढील बातमी
इतर बातम्या