बहिणचं निघाली वैरिण, अश्लिल क्लिप काढून देहविक्रीत ढकललं

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

अॅण्टाॅप हिल परिसरातील एका २४ वर्षीय तरूणीला तिच्याच सख्ख्या बहिणीने देहविक्री व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढंच नव्हे, तर तिची अश्लिल व्हिडिओ क्लिप काढून बहिणीने ती व्हायरल केल्याचं प्रकरणही पुढे आलं आहे. याप्रकरणी पीडित तरूणीने अॅण्टाॅप हिल पोलिसांत ४ मार्च रोजी चौघांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिस पीडित तरूणीची फरार बहिण आणि इतर आरोपींचा शोध घेत आहे.

काय आहे प्रकरण?

मूळची गोरखपूर येथे राहणारी पीडित तरूणी अॅण्टाॅप हिल इथं राहणाऱ्या आपल्या सख्ख्या बहिणीकडं २ महिन्यांपूर्वी राहायला आली होती. या बहिणीने नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिची तरबेज शेख नावाच्या मित्राची ओळख करून दिली. त्यानंतर बँकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरबेजने तिला घरी बोलावून घेतलं. पीडित तरूणी आपल्या बहिणीसोबत तरबेजच्या घरी गेल्यावर त्यांनी तिला शीतपेयातून गुंगीचं औषध पाजलं.

बहिणीदेखत बलात्कार

त्यानंतर तरबेजने तिच्यावर बलात्कार केला आणि या सर्व प्रकाराचा अश्लिल व्हिडिओ तिच्या सख्ख्या बहिणीने काढला. ही तरूणी शुद्धीवर आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. याचा जाब तिने बहिणीचा विचारला असता, तिने आपण म्हणतो तसं वाग नाहीतर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली.

व्हिडिओ केला व्हायरल

पीडित तरूणीच्या असाह्यतेचा फायदा उचलत बहिणीने जबरदस्तीने अनेकांसोबत तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. हा सारा प्रकार सलग २ महिने सुरू होता. त्यानंतर वेदनांनी त्रासलेल्या पीडित तरूणीने कुणाबरोबरही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने बहिणीने तिचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल केला.

आरोपी फरार

त्यानंतर मोठ्या हिमतीने या पीडित तरूणीने ४ मार्च रोजी अॅण्टाॅप हिल पोलिस ठाणे गाठत तिथं सख्खी बहिण, तरबेज शेख, त्याचा साथीदार सरफराज शेख आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून हे चारही जण अद्याप फरार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या