मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी आणि कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 17 हजार 500 कैदी आणि कच्च्या कैद्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये ३५ हजार २०० कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यापैकी ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. आतापर्यंत पाच हजारहून अधिक जणांची अंतरिम जामिनावर तर सहाशे जणांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. १२ हजार कैदी व कच्च्या कैद्यांचीही येत्या काही दिवसांत सुटका होणार आहे.
हेही वाचा -